

Death Was Just Feet Away, But He Never Dropped the Mic: The Untold Story of 26/11 attacks
eSakal
बाहेर गोळ्यांचा आवाज घुमत होता. स्थानकात धुराचे लोट पसरले होते. काही प्रवासी जीव वाचवण्यासाठी सैरावैरा धावत होते, तर काही जखमी अवस्थेत जमिनीवर पडले होते. प्रत्येकजण स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होता. अशा परिस्थितीत एका व्यक्तीने मात्र आपली जागा सोडली नाही.
त्याच्या हातात बंदूक नव्हती, ना स्वतःचा बचाव करण्यासाठी कोणतेही शस्त्र होते. त्याच्याकडे होता फक्त एक माईक! या माईकवरून तो प्रवाशांना सुरक्षित बाहेर पडण्याचे आवाहन करत होता. ही व्यक्ती म्हणजे रेल्वे अनाउंसर बबलू कुमार दीपक.