

Failed 34 Times, Became CAPF Assistant Commandant on 35th Attempt! Father's Words Kept Him Going
eSakal
Ajay Pratap Singh UPSC Success Story: असं म्हटलं जातं की, अपयश ही यशाची पहिली पायरी असते. मात्र, एखाद्याने अपयशाच्याच पायऱ्या चढत यशाचं शिखर गाठलं, तर त्यामागे असते ती प्रचंड इच्छाशक्ती आणि जिद्द! एखादं मोठं स्वप्न पूर्ण करायचं असेल, तर अपयश आलं म्हणून थांबून चालत नाही. याचं उदाहरण आहे उत्तर प्रदेशातील आग्रा येथील अजय प्रताप सिंह.
सरकारी अधिकारी होण्याचं स्वप्न उराशी बाळगून अजय यांनी एक-दोन नव्हे, तर तब्बल 34 वेळा विविध परीक्षांमध्ये अपयशाचा सामना केला. मात्र, त्यांनी हार मानली नाही. अखेर 35व्या प्रयत्नात त्यांना यश मिळालं आणि ते CAPF असिस्टंट कमांडंट बनले.