Crime News : बालशोषणाचा धक्कादायक प्रकार ! बेड बॉक्समध्ये लपवली मुलगी, वर झोपला घरमालक, पोलिसांनी 'अशी' केली सुटका, व्हिडिओ व्हायरल

Assam case : मुलगी अत्यंत अशक्त अवस्थेत आढळून तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.पीडित मुलीने सहा वर्षांपासून जबरदस्तीने काम आणि शारीरिक अत्याचार झाल्याची माहिती दिली. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून सोशल मीडियावर कठोर शिक्षेची मागणी होत आहे.
Crime News : बालशोषणाचा धक्कादायक प्रकार ! बेड बॉक्समध्ये लपवली मुलगी, वर झोपला घरमालक, पोलिसांनी 'अशी' केली सुटका, व्हिडिओ व्हायरल
Updated on

आसामध्ये एका अल्पवयीन मुलीच्या शोषणाची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका घरात पलंगाखाली असलेल्या स्टोरेज रूममध्ये एका अल्पवयीन मुलीला डांबून ठेवण्यात आले होते. तिची सुटका करण्यात आली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरही समोर आला आहे.आसाममधील जिल्हा कामगार कार्य दलाच्या उपस्थितीत ही बचाव मोहीम राबवण्यात आली. घरमालकाने १३ वर्षांच्या मुलीला सहा वर्षे डांबून ठेवले होते. कारवाई करण्यात आली तेव्हा अल्पवयीन मुलीला पलंगाखाली लपवले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com