Azamgarh Wedding Breaks After Dowry Demand
esakal
सप्तपदी झाल्यानंतर नवरी सार होण्यापू्र्वी लग्न मोडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हुंडा म्हणून म्हैस आणि एक लाख रुपये मागितल्याने वधूने सासरी जाण्यास नकार दिला आहे. शनिवारी उत्तर प्रदेशातील आझमगढ येथे ही घटना घडली. इतकच नाही, तर मुलीकडच्यांनी सासरच्या लोकांना काही काळ कैदही करून ठेवलं. मात्र, त्यानंतर हे लग्न मोडल्याचं जाहीर करण्यात आलं.