Bengaluru Airport CCTV
eskala
एका ऑटो चालकावर दोघांनी चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे. बंगळुरू विमानतळ परिसरात ही घटना घडली आहे. यावेळी सीआयएसएफच्या जवानाच्या हस्तक्षेपामुळे ऑटोरिक्षा चालकाचे प्राण वाचले. बंगळुरू विमानतळाच्या टर्मिनल १ वरील पीकअप पॉईंटजवळ हा संपूर्ण प्रकार घडला. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.