
प्रेम आंधळं असतं असं म्हणतात. जेव्हा कोणी प्रेमात पडते तेव्हा जात आणि वय पाहत नाही. बिहारच्या भागलपूर जिल्ह्यातून असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, येथील एका ५० वर्षीय महिलेने १८ वर्षीय मुलाशी लग्न केले आहे. रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की, महिलेच्या कुटुंबातील सदस्य या लग्नामुळे नाराज आहेत. महिलेची मुलगी आणि जावयाने पोलिस स्टेशनमध्ये जाऊन या लग्नाबद्दल तक्रार दाखल केली आहे आणि न्यायाची मागणी केली आहे.