Video : 'क्या लगता है पटा लोगे…'; भोजपुरी अभिनेत्रीच्या प्रश्नाने चाहत्यांचे तापमान शंभरीपार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Viral Video

Video : 'क्या लगता है पटा लोगे…'; भोजपुरी अभिनेत्रीच्या प्रश्नाने चाहत्यांचे तापमान शंभरीपार

जर आपण इंस्टाग्राम वापरत असाल आणि या भोजपुरी अभिनेत्रीचा व्हिडिओ पाहिला नसेल तर काय बघितलं... भोजपुरी अभिनेत्री स्नेह उपाध्याय हीने सध्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. तिच्या व्हिडिओने चाहत्यांना घायाळ केलं आहे. सोशल मीडियावर तिच्या रीलने धुमाकूळ घातला असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.

हेही वाचा - भारतीय क्रिकेटची नवी आशा- पृथ्वी शाॅ

आपल्या रीलमध्ये ती म्हणते की, ‘क्या लगता है पटा लोगे…पटना के लईकी पटेगी नहीं, दिल्ली की दिल बेटा देगी नहीं, आरा के लईकी आर-पार क देगी, दिलवा पे धांय-धांय वार क देगी. छपरा के लईकी तो फाड़ डालेगी’ तर हा व्हिडिओ पाहून अनेकांचं भान हरपलं आहे. तिच्या अदा लोकांना आकर्षित करणाऱ्या आहेत.

दरम्यान, इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओला ११ लाखांपेक्षा जास्त लोकांनी लाईक केलं असून अनेकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तर चाहत्यांनी स्नेहचा हा व्हिडिओ आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे.