Viral Video : अरेरे वर्दीला लाज आणली ! पोलिस उपअधीक्षकानेच मैत्रिणीच्या घरात केली चोरी, मोबाईल अन् दोन लाख घेऊन फरार, व्हिडिओ समोर

DSP Kalpana Raghuvanshi Theft : भोपाळमध्ये महिला डीएसपी कल्पना रघुवंशीवर मैत्रिणीच्या घरातून चोरी केल्याचा आरोप झाला.चोरीत दोन लाख रुपये आणि मोबाईल फोन घेऊन त्या फरार झाल्या. चोरी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
CCTV footage captures Bhopal DSP Kalpana Raghuvanshi entering and exiting her friend’s house — allegedly stealing ₹2 lakh cash and a mobile phone, sparking outrage in Madhya Pradesh Police.

CCTV footage captures Bhopal DSP Kalpana Raghuvanshi entering and exiting her friend’s house — allegedly stealing ₹2 lakh cash and a mobile phone, sparking outrage in Madhya Pradesh Police.

esakal

Updated on

मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका वरिष्ठ महिला अधिकाऱ्यावर चोरीचा आरोप करण्यात आला आहे, ज्यामुळे मध्य प्रदेश पोलिस विभागात खळबळ उडाली आहे. कल्पना रघुवंशी पोलिस मुख्यालयात पोलिस उपअधीक्षक (डीएसपी) म्हणून कार्यरत आहेत. मैत्रिणीच्या घरातून दोन लाख रुपये रोख आणि मोबाईल फोन चोरी केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भोपाळच्या जहांगीराबाद पोलिस स्टेशन परिसरात घडलेल्या या घटनेने पोलिस दलाच्या सचोटी आणि जबाबदारीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. कल्पनाच्या मैत्रिणीचा आरोप आहे की तिने तिचा मोबाईल फोन चार्जिंगला लावला होता आणि आंघोळीसाठी गेली होती. दरम्यान, पोलिस अधिकारी कल्पना रघुवंशी घरात घुसल्या आणि तिच्या हँडबॅगमधून पैसे आणि मोबाईल फोन चोरला. जेव्हा ती बाथरूममधून बाहेर पडली तेव्हा रोख रक्कम आणि फोन दोन्ही गायब होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com