AI Video of PM Modi and Mother Sparks Row
esakal
AI video showing PM Modi and his mother goes viral, sparks political storm : काँग्रेसच्या बिहारमधील मतदार यात्रेत पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या आईबद्दल अपमानास्पद भाषेचा वापर झाल्याचा आरोप भाजपाकडून करण्यात आला होता. त्यावेळी मोठं राजकारण तापलं होतं. अशातच आता पंतप्रधान मोदी आणि त्याच्या आईबरोबरच्या संवादाचा एक एआय व्हिडिओ समोर आला आहे. यावरून पुन्हा एकदा राजकारण तापलं आहे. हा व्हिडीओ काँग्रेसने बनवण्यात आल्याचा आरोप भाजपाकडून करण्यात आला आहे. यावरूनच आता आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत.