

Boss Fired Woman From Job For Early Arrived At Work
ESakal
जरा विचार करा, जगात बहुतेक लोकांना उशिरा पोहोचल्यामुळे कामावरून काढून टाकले जाते. पण स्पेनमधील एका महिलेसोबत उलट घडले. तिच्या कंपनीने तिला कामावरून काढून टाकले कारण ती दररोज खूप लवकर कामावर येत असे. हो, हा विनोद नाही. ती मुलगी सकाळी ७:३० वाजताच्या शिफ्टसाठी सकाळी ६:४५ वाजता ऑफिसमध्ये पोहोचायची आणि या सवयीमुळे तिची नोकरी धोक्यात आली. हे प्रकरण न्यायालयापर्यंत पोहोचले.