Ganpati Visarjan : 'विसर्जन मिरवणुकीत डान्स करण्यासाठी मुले-मुली हवेत!' पुण्यातील जाहिरात व्हायरल

पुण्यातील भोसरी येथील एका मंडळाने ही जाहिरात दिली आहे.
Pune Advertising
Pune AdvertisingSakal

भोसरी : सध्या सगळीकडे गणेशोत्सवाचा उत्साह असून २८ सप्टेंबर रोजी गणपती विसर्जन होणार आहे. तर पुणे मुंबईत एक दिवस अगोदर गणपतीची विसर्जन मिरवणूक सरू होते. या मिरवणुका पाहण्यासाठी राज्यभरातून अनेक गणेशभक्त येत असतात. तर सध्या एका मंडळाने पेपरमध्ये दिलेली जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल झाली असून गणपती विसर्जन मिरवणुकीत डान्स करण्यासाठी मुले मुली हवेत अशी ही जाहिरात आहे.

दरम्यान, पुण्यातील भोसरी येथील एका मंडळाने ही जाहिरात दिली असून "२७ सप्टेंबर रोजी फक्त एका दिवसासाठी संध्याकाळी पाच ते दहा वाजेपर्यंत गणपती विसर्जन मिरवणुकीत डान्स करण्यासाठी मुले मुली हवेत..." अशी ही जाहिरात आहे. मुलामुलींचे वय १८ ते ३० च्या दरम्यान असले पाहिजे आणि एका मुलाल ३०० रूपये मानधन मिळेल असंही या जाहिरतीमध्ये देण्यात आलं आहे.

Pune Advertising
Video Viral : धक्कादायक! हातपाय पकडून उचलबांगडी; शिक्षकाची विद्यार्थ्याला 2 दिवस काठीने मारहाण

सोशल मीडियावर या जाहिरातीचा फोटो व्हायरल झाला आहे. अनेक गणेशभक्तांनी याप्रकरणी फोटोवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून ही जाहिरात शेअर केली जात आहे.

Advertising
AdvertisingSakal

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com