हृदयद्रावक! लग्नाच्या दिवशीच नवरीचा मृत्यू, गावात शोककळा | Bride Death on Wedding Day | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Wedding

हृदयद्रावक! लग्नाच्या दिवशीच नवरीचा मृत्यू, गावात शोककळा | Bride Death on Wedding Day

लखनऊ : उत्तरप्रदेशमध्ये लग्नाच्याच दिवशी एका नवरीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या मृत्यूमुळे विवाहाच्या दोन्ही कुटुंबावर शोककळा पसरली आहे. उत्तरप्रदेशच्या अमरोहा गावातील हसनपूर भागात राहणाऱ्या एका शेतकऱ्याच्या घरी ही घटना घडली असून त्याच्या 20 वर्षीय मुलीचा लग्नाच्या दिवशीच मृत्यू झालाय, ती मागच्या चार ते पाच दिवसांपासून आजारी होती.

अधिक माहितीनुसार, कविता (20) असं मृत्यू झालेल्या तरूणीचे नाव असून चंदकिरण असं तिच्या विडिलांचं नाव आहे. ते उत्तरप्रदेशातील कोतवाली परिसरातील रुस्तमपूर खादर गावात कुटुंबासह राहतात.

त्यांना तीन मुली आणि एक मुलगा असून त्यांच्या मोठ्या मुलीचा विवाह हसनपूर येथील रहिवासी मिंटू सैनी याच्याशी होणार होता. 15 मार्च रोजी तिचा विवाह होणार होता. परंतु, तापामुळे लग्नाच्या दिवशीच तिचा मृत्यू झाला. त्यामुळे गावावर आणि दोन्ही कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

दरम्यान, ती आजारी असल्याने तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मुरादाबाद येथील खासगी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू होते. तिची प्रकृती खालावल्याने डॉक्टरांनी तिच्या कुटुंबियाना कळवलं होतं. पण ज्या दिवशी तिचा विवाह होणार होता त्याच दिवशी तिची प्राणज्योत मावळली.

टॅग्स :deathmarriagewedding