झोपाळ्याची साखळी तुटली अन् जोडपं कोसळलं दरीत; थरारक Video कॅमेऱ्यात कैद

सावधान! अशा धोकादायक जागेवर स्टंट करणं जीवावर बेतू शकतं
Viral Video
Viral VideoSakal

आपण एखाद्या ठिकाणी फिरायला गेल्यावर अनेकदा साहसी खेळ खेळत असतो. तर पॅराग्लायडिंग यासारखे साहसी खेळ कधीकधी जीवावर बेतू शकतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामध्ये एक जोडपं शिखराच्या टोकावरून दरीत कोसळलं आहे.

Viral Video
LGBTQ Community : "आमचं लग्न आता लीगल होईल का?" लेस्बियन कपलने शेअर केला Emotional Video

हे जोडपं शिखराच्या टोकावर असलेल्या झोपाळ्यात बसून झोका खेळत आहेत. तर पाठीमागून एक जण त्यांना झोका देताना आपल्याला दिसत आहे. नंतर झोक्याची दिशा बदलते आणि झोका लोखंडी पोलला लागून हे जोडपे दरीत कोसळते. त्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या लोकांना मोठा आरडाओरड केल्याचं आपल्याला या व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून आपल्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.

आपण अशा ठिकाणी पर्यटनासाठी गेल्यानंतर धोकादायक ठिकाणापासून दूर राहायला पाहिजे. नाहीतर जास्तीची मस्ती अशा प्रकारे जीवावर बेतू शकते. अशा ठिकाणी फिरायला गेल्यावर पर्यटकांनी विशेष काळजी घ्यायला पाहिजे.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून पसंती मिळत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून लाईक केलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जात असतात.

सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये विनोदी व्हिडिओ, डान्स व्हिडिओ, लग्नातील व्हिडिओ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओचा सामावेश असतो. सध्या सोशल मीडिया हे तरूणांच्या मनोरंजनाचे साधन बनले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com