Video Viral : बिन बुलाये मेहमान! लग्नाच्या समारंभात वळूची एन्ट्री अन्... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video

Video Viral : बिन बुलाये मेहमान! लग्नाच्या समारंभात वळूची एन्ट्री अन्...

लग्न म्हटलं की आनंदाचा उत्सव असतो. यावेळी सगळेजण आनंदी असतात. संगीत, भोजन, वरात अशा कार्यक्रमाची मेजवानी लग्न समारंभात असते. यावेळी जर व्यत्यय न यावा यासाठी सगळेच प्रयत्न करत असतात. तर असाच एक व्हिडिओ समोर आला असून यामध्ये लग्न समारंभात एक वळू घुसलेला दिसत आहे.

(Bull in marriage hall video viral)

हेही वाचा - सीमावादात रक्त सांडायला मराठी माणूसच का?

या व्हिडिओमध्ये एक बैल लग्नाच्या हॉलमध्ये घुसला असून त्याला पाहून सगळ्यांचीच पाचावर धारण बसली आहे. तर त्याला बाहेर काढण्यासाठी काहीजण प्रयत्न करत आहेत. तर त्यांनाही तो धडक देण्याचा प्रयत्न करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. त्यानंतर तो एका पडद्यामधून बाहेर जाताना आपल्याला दिसत आहे.

हेही वाचा: Viral Video : थोडीशी दारू प्यायचीय पप्पा...; दारूसाठी लेकरू ढसाढसा रडलं

दरम्यान, लग्नात आलेल्या पाहुण्यांना याचा त्रास झाला असल्याचं या व्हिडिओत दिसतंय. बिन बुलाये मेहमान असं कॅप्शन टाकून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून अनेकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. तर मजेशीर कमेंट या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

टॅग्स :Bullviral video