

Boss gave 1 lakh rupees To employees Diwali Bonus
ESakal
दिवाळीत बहुतेक कंपन्या कर्मचाऱ्यांना सोन पापडीचा बॉक्स, मिठाई किंवा काही हजार रुपयांचा बोनस देतात. पण गुजरातच्या सुरतमधील एका व्यापाऱ्याने त्याच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस म्हणून तब्बल १ लाख रुपये दिल्याचे समोर आले आहे. आपल्या कर्मचाऱ्यांच्या मेहनतीवर खूश झालेल्या एका कापड व्यापाऱ्याने दिवाळी बोनस म्हणून प्रत्येकी १ लाख रुपये दिले आहेत. या प्रकाराचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.