

A concerned parent holding a stack of school books and a ₹9,000 bill highlights the rising cost of education materials in Chandigarh.
esakal
Parents Raise Concerns Over Rising Education Costs : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. चंदीगडमधील एका व्यक्तीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला असून, त्यात त्याने असा दावा केला आहे की, त्याच्या मुलाच्या शाळेने त्याला इयत्ता दुसरीच्या पाठ्यपुस्तके, वह्या आणि इतर शालेय साहित्यासाठी ९,००० रुपयांचे बिल दिले आहे. केवळ सहा वह्या, काही स्टिकर्स आणि मोजक्याच मूलभूत साहित्यासाठी इतकी मोठी रक्कम आकारल्याचे पाहून पालक थक्क झाले आहेत.