Chandra Song: परदेशी नागरिकांनाही चंद्रा गाण्याची भूरळ! पाहा भन्नाट व्हिडिओ

परदेशी तरुणींच्या या डान्सचं युजर्सनं तोंडभरुन कौतुक केलं आहे. तुम्हीही एकदा व्हिडिओ पाहाच!
Chandra
Chandra

मुंबई : काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या प्रसाद ओक दिग्दर्शित 'चंद्रमुखी' या चित्रपटातील 'चंद्रा' गाण्यानं राज्यासह देशभरातील संगीत रसिकांना वेड लावलं होतं. अजय अतुलच्या संगीतसाजानं नटलेल्या या गाण्यात वेगळीच नशा आहे. त्यामुळेचं या गाण्याची परदेशी नागरिकांनाही भूरळ पडली आहे. याचा एक भन्नाट व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (Chandra Marathi Song Foreign citizens also love Chandra Song Watch awesome dance video)

Chandra
ST Employee Bonus: एसटी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! दिवाळी बोनस जाहीर

व्हायरल व्हिडिओत परदेशी तरुणी चंद्रा या गाण्यावर नाचताना दिसत आहे. परदेशातील रस्त्यावर तरुणींच्या या ग्रुपनं या गाण्यावर हुबेहुब अमृता खानविलकरप्रमाणं नृत्य सादर केलं आहे. विशेष म्हणजे हा तरुणींचा ग्रुप प्रोफेशनल डान्सर असल्याचं यातून स्पष्ट होतं. कारण त्यांच्या डान्सस्टेप्समध्ये परफेक्शन दिसून येतं. विशेष म्हणजे शॉर्ट आणि टॉप त्यात गळ्यात विविधरंगी स्टोल अशा पेहरावात या गाण्यावर तरुणी थिरकलेल्या दिसल्या.

व्हायरल व्हिडिओला मोठा प्रतिसाद

अजय-अतुल फॅन्स नामक एका फेसबुक पेजवर हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला असून त्याला ४० हजारांहून अधिक लाईक्स, ८०० हून अधिक कमेंट्स आणि जवळपास साडेचार हजार शेअर्स आहेत. यावरुन मोठ्या प्रमाणावर लोकांनी हा व्हिडिओ पाहिल्याचं स्पष्ट होत असून अनेकांना तो आवडलाही आहे.

युजर्सनी केलंय कलाकारांचं कौतुक

युजर्सनी यावर अनेक पॉझिटिव्ह कमेंट्स केल्या आहेत. यामध्ये अनेकांनी अजय-अतुलच्या संगीताची जादूच निराळी असल्याचं म्हटलं आहे. तर अनेकांनी चंद्रा गाण्याची कोरियोग्राफर फुलवा खामकर, गायक श्रेया घोषाल आणि अभिनेत्री अमृता खानविलकर यांच्या कामगिरीकीचंही कौतुक केलं आहे.

विश्वास पाटलांच्या कांदबरीवर आधारित सिनेमा

प्रसिद्ध लेखक-कादंबरीकार विश्वास पाटील यांच्या चंद्रमुखी या कादंबरीवर आधारित त्याच नावाचा हा सिनेमा आहे. यामध्ये एक बडा राजकारणी आणि तमाशा कलावंतीन यांच्यावर बेतलेला आहे. यामध्ये राजकीय संघर्ष आणि दुसरीकडे त्यांमध्ये बहरलेलं प्रेम याची ही गोष्ट आहे, अजय-अतुलच्या संगिताची ही एक ट्रीटच आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com