Divorce Petition :‘काळा रंग, जाडजूड शरीरयष्टी’वरून पत्नी टोमणे मारते; पतीने मागितला घटस्फोट, हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

Mental Cruelty : पतीने पत्नी आपल्याला रंग आणि शरीरयष्टीवरून टोमणे मारत असल्याचे, धमक्या देत असल्याचे आणि वारंवार माहेरी जात असल्याचे आरोप केले. तर पत्नीने पतीचे दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोप केला.
Chhattisgarh High Court rejects divorce petition

Chhattisgarh High Court rejects divorce petition

esakal

Updated on: 

Husband Alleges Taunts Over Skin Colour and Body Type : छत्तीसगड उच्च न्यायालयाने घटस्फोटाच्या एका प्रकरणात महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवत पतीची याचिका फेटाळून लावली आहे. पत्नी आपल्याला काळा रंग आणि जाडजूड शरीरयष्टीवरून टोमणे मारत असल्याचा पतीचा आरोप होता. मात्र, केवळ अशा प्रकारच्या आरोपांच्या आधारे घटस्फोट मंजूर करता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. न्यायमूर्ती पार्थ प्रतिम साहू आणि न्यायमूर्ती सचिन सिंग राजपूत यांच्या खंडपीठाने कौटुंबिक न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार दिला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com