Viral Video : या चिमुकलीने केलंय वातावरण टाईट; डान्सरही पडतील फिके | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Viral Video

Viral Video : या चिमुकलीने केलंय वातावरण टाईट; डान्सरही पडतील फिके

लहान मुळे खूप भन्नाट असतात. ते एखाद्या गोष्टीत माहीर असतात. तर काही गोष्टी त्यांना सांगाव्या लागत नाहीत, काही मुले छान डान्स करतात. त्यांना सांगण्याची गरज पडत नाही. त्यांचा डान्स आपल्याला मोहित करत असतो. एका चिमुकलीच्या डान्सचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

हेही वाचा - ..तर तुम्हालाही मिळू शकेल इन्कमटॅक्सचा जुना रिफंड

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये ही मुलगी गायक अजय हुडा यांच्यासोबत कमर तेरी लेफ्ट राईट या गाण्यावर भन्नाट डान्स करताना दिसत आहे. तिचा डान्स पाहून आपणही थक्क व्हाल. एखाद्या चांगल्या डान्सरलाही लाजवेल असा डान्स या चिमुकलीने केला आहे. तिने दिलेले ठुमके आणि तिचे हावभाव चांगल्या डान्सरला फिके पाडतील असे आहेत. या व्हिडिओला सोशल मीडियावर चांगली पसंती मिळत आहे.

दरम्यान, या व्हिडिओला इंस्टाग्रामवर अपलोड करण्यात आलं असून या व्हिडिओला ६ दशलक्ष लोकांनी लाईक केलं आहे. तर अनेक नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून अनेकांनीहा व्हिडिओ शेअर केला आहे.

टॅग्स :danceChildrenviral video