Children's Day Viral Video : चिमुरड्यांच्या डान्ससमोर 'चंद्रा'ही फिकी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Children's Day Viral Video

Children's Day Viral Video : चिमुरड्यांच्या डान्ससमोर 'चंद्रा'ही फिकी

Childrens Day Viral Vedio : भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची आज जयंती साजरी होत आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म १४ नोव्हेंबर १९८९ रोजी झाला. माजी पंतप्रधान नेहरू यांची आज १३३ वी जयंती साजरी होत असून, आज देशभरात बालदिनदेखील मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.

हेही वाचा : मामाच्या जमिनीवरून सावकाराला पळविणारा 'डेबू' कसा बनला गाडगेबाबा.....

पंडित जवाहरलाल नेहरूंना मुलांवर खूप प्रेम होते सगळे त्यांना 'चाचा नेहरू' म्हणायचे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक नेत्यांनी माजी पंतप्रधान पंडित नेहरूंना स्मरण करून त्यांना आदरांजली वाहिली आहे. याशिवाय सोशल मीडियावर बालदिन असा ट्रेंड करत आहे.

हेही वाचा: Viral Photo : शिवभक्तीचा अनोखा अंदाज! डंबेल अन् वेट प्लेटने बनवलेले शिवलिंग, फोटो बघताच म्हणाल...

ट्वीटरवर #ChildrensDay चा ट्रेंड

आजच्या बालदिनी ट्वीटरवर #ChildrensDay ट्रेंड होत असून, सध्या काही लहान मुलांचा डान्सचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये शाळेतील लहान मुले रामुलु रामुला या तेलगू गाण्यावर नाचताना दिसत आहेत. चिमुरड्यांचं बेभान होऊन नाचण्याने अनेक यूजर्स प्रभावित झाले आहेत.

याशिवाय आयपीएलच्या दोन मोठ्या संघांनीही ट्विटरवर खास पद्धतीने बालदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने त्यांच्या सर्वोत्कृष्ट खेळाडूंचे त्यांच्या बालपणीचे फोटो शेअर केले आहेत. तर, दुसरीकडे चेन्नई सुपर किंग्जच्या ट्विटर अकाऊंटवर महेंद्रसिंग धोनी, सुरेश रैना आणि रवींद्र जडेजा यांचे त्यांच्या मुलांसोबतचे फोटो शेअर करण्यात आले आहेत.