chris gayle
chris gayleSakal

Video Viral : क्रिस गेल उघडाच गेला जीममध्ये; म्हणाला 2 दिवसांत अ‍ॅप्स बनवणार

तुफानी फलंदाज म्हणून ओळख असलेल्या वेस्ट इंडिजचा खेळाडू क्रिस गेलचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये तो जीममध्ये जाताना दिसत असून मला फक्त दोन मिनीटात अॅप्स पाहिजेत असं सांगताना दिसत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

हेही वाचा - Inside Online Dating : हुक अप्स, ओपन रिलेशनशिप्स की...; महाराष्ट्रातील तरुणाई नक्की काय शोधते?

दरम्यान, या व्हिडिओमध्ये क्रिस गेल आपल्या हातात एक पिशवी घेऊन उघडाच जीममध्ये पोहोचला आहे. तर मला फक्त दोन मिनीटात अॅप्स बनवायचे आहेत असं सांगतो. त्याचा हा व्हिडिओ पाहून अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी आपल्या मजेशीर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. भारताचा माजी स्फोटक फलंदाज युवराज सिंगसुद्धा त्याचा व्हिडिओ पाहून हसू लागला आहे.

क्रिस गेल हा तुफानी फलंदाज असून तो आयपीएलमध्ये आरसीबीकडून खेळत होता. तो फलंदाजीसाठी जेवढा ओळखला जातो तेवढाच विनोदातही पुढे आहे. तर या व्हिडिओला पाच लाख व्हूज आले तर या वर्कआऊटचा पुढचा भाग अपलोड केला जाईलं असंही त्याने या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com