

कल्पना करा की तु्म्ही कार चालवत आहात आणि अचानक साईड मिररमधून साप निघाला तर काय होईल? हे दृश्य पाहून कोणीही घाबरुन जाईल. असाच प्रकार एका कारचालकासोबत घडला आहे. ज्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ड्रायव्हरने कारच्या साईड मिररमधून साप बाहेर पडताना पाहिला. लगेच त्याने ही प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला.