Viral Video : याला म्हणतात नाद! पठ्ठ्याने चक्क कॉलेजमध्ये आणला ट्रॅक्टर; पोरं बघतच राहिले

या विद्यार्थ्यांने इतर विद्यार्थ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
Viral Video
Viral Videosakal

आपण कॉलेजमध्ये गाडीवर किंवा सायकलवर गेला असाल. काही जण कॉलेज जवळ राहत असतील तर पायीसुद्धा येत असतात. तर लांबून येणारे काही विद्यार्थी बसने प्रवास करत येत असतात. पण एखाद्या विद्यार्थ्याने कॉलेजमध्ये थेट ट्रॅक्टर आणल्याचा प्रकार आपण पाहिलाय का? सध्या एक व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यामध्ये एका विद्यार्थ्याने कॉलेजमध्ये ट्रॅक्टर आणल्याचं दिसत आहे.

सोशल मीडियावर अनेक विनोदी व्हिडिओ व्हायरल होत असतात. तर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये काही विद्यार्थी चालत किंवा गाडीवर कॉलेजच्या गेटमधून बाहेर पडत आहेत. तर त्यानंतर एक विद्यार्थी आपलं ट्रॅक्टर आणि ट्रॉली घेऊन बाहेर पडतो आणि सगळे विद्यार्थी त्याच्याकडे पाहतात.

Viral Video
Vjay Wadettiwar : "आनंदाचा शिधा भेसळयुक्त, वजनही कमी! सरकार खातंय गरिबांच्या हक्काचा शिधा"

दरम्यान, कॉलेजच्या वयात असताना अनेक विद्यार्थी आपल्या पालकांकडे चांगली गाडी घेऊन देण्याची मागणी करत असतात. तर "आपल्याकडे उपलब्ध असलेल्या वाहनाने कॉलेजला कॉलेजला जाण्याची मजाच वेगळी आहे. या विद्यार्थ्याने कॉलेजला ट्रॅक्टर आणून नाद केला आहे." अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com