Congo Plane Crash Landing Video
esakal
डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ काँगोतील कोलवेजी विमानतळावर मोठा विमान अपघात टळला आहे. काँगोचे केंद्रीय मंत्री लुई वॅटम कबाम्बा आणि त्यांचे २० सदस्यीय प्रतिनिधीमंडळ घेऊन जाणारे विमान लँडिंगदरम्यान अचानक अनियंत्रित झालंय. यावेळी विमानाचे लँडिंग गियर तुटले आणि काही सेकंदातच विमानाने पेट घेतला. पण त्यानंतर केंद्रीय मंत्र्यासह सर्व सदस्य्यांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं. या अपघाताचा व्हिडीओ आता समोर आला आहे.