राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत समर्थकांनी काढले शर्ट; डान्सचा Video तुफान व्हायरल I Bharat Jodo Yatra | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bharat Jodo Yatra Haryana

जशी पदयात्रा पुढं सरकत होती, तसतसे उत्साही कार्यकर्ते बसवर उभं राहून घोषणा देत डान्स करत होते.

Bharat Jodo Yatra : राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत समर्थकांनी काढले शर्ट; डान्सचा Video तुफान व्हायरल

Bharat Jodo Yatra : हरियाणाच्या कर्नालमध्ये (Haryana) भारत जोडो यात्रेत काँग्रेस कार्यकर्त्यांनी (Congress Workers) जोरदार डान्स केलाय. 4.5 अंश सेल्सिअस तापमानात राहुल गांधींचे समर्थक शर्ट काढून नाचताना दिसले. यावेळी समर्थकांनी बसवर उभं राहून हरियाणवी गाण्यांवर जबरदस्त डान्स केला.

दाट धुक्यात राहुल गांधींची (Rahul Gandhi) पदयात्रा आज (रविवार) सकाळी कर्नालमध्ये पोहोचली. जशी पदयात्रा पुढं सरकत होती, तसतसे उत्साही कार्यकर्ते बसवर उभं राहून घोषणा देत डान्स करत होते. यावेळी समर्थकांनी हवेत शर्ट फिरवत जोरदार डान्स केला.

हेही वाचा: VIDEO : राष्ट्रगीत सुरू असतानाच 'या' देशाच्या राष्ट्रपतींनी केली पँटेत लघवी; 6 पत्रकारांना अटक

माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंग हुड्डा यांच्यासह आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि पक्षाचे नेते हरियाणात काँग्रेस नेते राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झाले आहेत. यात्रेदरम्यान, घारौंडा मतदारसंघात राहुल गांधी आणि लोकसभा खासदार दीपेंद्र हुडा यांनी मागासवर्गीय सदस्यांच्या शिष्टमंडळाची भेट घेतली. यावेळी शिष्टमंडळानं आपल्या समस्या राहुल गांधींना सांगितल्या आणि त्यांनी समस्यांवर सखोल चर्चा केली.

हेही वाचा: Deepak Kesarkar : 'आम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या तावडीतून शिवसेनेला सोडवलं म्हणून, लोक आमचं कौतुक करतात'

पदयात्रा 10 जानेवारीला पंजाबात दाखल होणार

ही पदयात्रा 10 जानेवारी रोजी शंभू सीमेवरून पंजाबमध्ये प्रवेश करेल आणि फतेहगढ साहिबला रवाना होईल. 11 जानेवारी रोजी गुरुद्वारा साहिब इथं नतमस्तक झाल्यानंतर राहुल गांधी जाहीर सभेला संबोधित करतील.