VIDEO : राष्ट्रगीत सुरू असतानाच 'या' देशाच्या राष्ट्रपतींनी केली पँटेत लघवी; 6 पत्रकारांना अटक

राष्ट्रपती कीर यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.
President Salva Kiir Mayardit
President Salva Kiir Mayarditesakal
Summary

दक्षिण सुदानचे राष्ट्राध्यक्ष साल्वा कीर मायार्डित यांचा एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

President Salva Kiir Mayardit : दक्षिण सुदानचे राष्ट्राध्यक्ष साल्वा कीर मायार्डित यांचा एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. सुदानमध्ये पत्रकार आणि सरकार यांच्यात जोरदार खडाजंगी सुरू आहे.

एवढंच नाही तर राष्ट्रपतींचा व्हिडिओ प्रसारित केल्याबद्दल दक्षिण सुदानमध्ये सहा पत्रकारांना (South Sudan Journalist) ताब्यात घेण्यात आलंय. अनधिकृत व्हिडिओ फुटेज जारी केल्याच्या संशयावरून पत्रकारांना ताब्यात घेतलंय.

President Salva Kiir Mayardit
Love Jihad : आमच्याशी लग्न करून मुस्लिम व्हा, नाहीतर तोंड दाखवायला जागा ठेवणार नाही; हिंदू मुलींना धमकी

दरम्यान, राष्ट्रपती कीर यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. या व्हिडिओत राष्ट्रपतींची पँट ओली झालेली दिसत आहे. हा व्हिडिओ एका सार्वजनिक कार्यक्रमादरम्यानचा आहे. द गार्डियनच्या म्हणण्यानुसार, व्हिडिओमध्ये दक्षिण सुदानचे राष्ट्राध्यक्ष साल्वा कीर हे राष्ट्रगीतासाठी उभे असलेले दिसत आहेत, तर त्यांच्या पँटेचा काही भाग ओला झालेला दिसत आहे, त्यामुळं त्यांनी लघवी केल्याचा संशय व्यक्त होत आहे.

President Salva Kiir Mayardit
Air India Urination Case : ..तर 'ही' घटना टाळता आली असती; Air India च्या सीईओंचं मोठं वक्तव्य

राष्ट्रपतींनी पँटेत लघवी केली?

या कार्यक्रमात माध्यमांचे कॅमेरामन उपस्थित होते, जे संपूर्ण कार्यक्रम कव्हर करत होते. दरम्यान, प्रसारमाध्यमांनी राष्ट्रपतींच्या पँटेवर कॅमेरे फोकस करून ही घटना टिपलीये. राष्ट्रपतींनी पँटेत लघवी केल्याचा व्हिडिओवरून सर्वांना संशय आलाय. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, सुदानच्या लोकांनी साल्वा कीर यांच्या देशाचा कारभार चालवण्याच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत. वास्तविक, राष्ट्राध्यक्ष साल्वा कीर मायार्डित दक्षिण सुदानचे राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून देशात कोणत्याही निवडणुका झाल्या नाहीत.

6 पत्रकारांना अटक

ताब्यात घेण्यात आलेल्या पत्रकारांमध्ये कंट्रोल रूम डायरेक्टर जॉबल टॉम्बे, कॅमेरा ऑपरेटर आणि टेक्निशियन व्हिक्टर लाडो, कॅमेरा ऑपरेटर जोसेफ ऑलिव्हर, जेकब बेंजामिन, मुस्तफा उस्मान आणि कंट्रोल रूम टेक्निशियन चेरबेक रूबेन यांचा समावेश आहे. दरम्यान, अधिकार्‍यांनी या सहा पत्रकारांची बिनशर्त सुटका करावी, अशी मागणी पत्रकार संरक्षण समितीचे प्रतिनिधी मुथोकी मुमो यांनी केलीये. किर हे 2011 मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यापासून दक्षिण सुदानचे अध्यक्ष आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com