Daughter Surprises Mother With Unexpected Visit
esakal
आजच्या धावपळीच्या जीवनात करिअर आणि जबाबदाऱ्या सांभाळताना आपण अनेकदा आपल्या जवळच्या माणसांसाठी वेळ काढायला विसरतो. पैसे कमावण्याच्या नादात दिवस कधी संपतो, हेही कळत नाही. मात्र, या सगळ्या धावपळीत आईच्या चेहऱ्यावरचं हसू पाहण्यासाठी काढलेला थोडासा वेळही आयुष्यभराची आठवण बनून राहतो. सध्या सोशल मीडियावर असाच एक भावूक व्हिडीओ व्हायरल होत आहे. एका मुलीने आपल्या आईला अचानक घरी जाऊन सरप्राइज दिलं. त्यानंतर आईने दिलेली प्रतिक्रिया पाहून अनेक नेटकऱ्यांचे डोळे पाणावले आहेत.