

Deepa Bhati’s inspiring journey from homemaker to UP PCS officer at age 40
esakal
स्वप्न पूर्ण करण्यासाठी वयाची मर्यादा नसते, हे उत्तर प्रदेशातील दीपा भाटी यांनी सिद्ध करून दाखवले आहे. गौतम बुद्ध नगर जिल्ह्यातील कोंडली बांगर या छोट्या गावातील दीपा यांनी वयाच्या ४० व्या वर्षी उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाच्या (यूपी पीसीएस) परीक्षेत १६६ वा क्रमांक मिळवला. तीन मुलांची जबाबदारी, घरातील कामे आणि लग्नानंतर शिक्षणात आलेला खंड या अडचणींवर मात करत त्यांनी अधिकारी होण्याचे स्वप्न साकार केले. लग्नाला १८ वर्षे झाल्यानंतर त्यांनी पुन्हा अभ्यास सुरू केला आणि अखेर यश मिळवले.