COMPANY GIFTS IPHONE 16
esakal
IPHONE 16 AS DIWALI BONUS FOR EMPLOYEES: दिवाळीनिमित्त अनेकांना कंपनीकडून वेगवेगळे गिफ्ट मिळतात. काहींना मिठाईचे बॉक्स, काहींना ट्रॉली बॅग, तर काहींना किचनमधील भांडी बोनस म्हणून दिले जातात. परंतु दिल्लीतील एका कंपनीनं कर्मचाऱ्यांना असं गिफ्ट दिलय की, ज्याची सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगताना पहायला मिळतेय. या कंपनीनं दिवाळीचा बोनस म्हणून कर्मचाऱ्यांना चक्क iPhone 16 फोन भेट म्हणून दिला आहे. सध्या या गिफ्टची सगळीकडे चर्चा रंगताना पहायला मिळतेय.