Delhi Metro Viral Video: दिल्ली मेट्रोमध्ये मुलींनी उधळले रंग, केला आक्षेपार्ह डान्स; VIDEO पाहून लोक संतापले

Delhi Metro Viral Video: दिल्ली मेट्रोतील रिल्स मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. पोलिसांनी कारवाईचा इशारा दिल्यानंतर देखील तरुण-तरुणी दिल्ली मेट्रोत रिल्स बनवतात.
Delhi Metro Viral Video
Delhi Metro Viral Videoesakal

Delhi Metro Viral Video: दिल्ली मेट्रोतील रिल्स मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. पोलिसांनी कारवाईचा इशारा दिल्यानंतर देखील तरुण-तरुणी दिल्ली मेट्रोत रिल्स बनवतात. दोन मुलींनी होळीच्या पार्श्वभूमीवर रंग लावून आक्षेपार्ह वर्तन केल्याची घटना समोर आली आहे. याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

व्हिडिओमध्ये पांढरी साडी आणि सूट घातलेल्या दोन मुली मेट्रोच्या आत एकमेकांना रंग लावताना दिसत आहेत. यावेळी त्यांनी भरपूर गुलाल देखील उधळला.  'आंग लगा दे रे, मोहे रंग लगा दे रे, मैं तो तेरी जोगनिया, तू जोग लगा दे रे, प्रेम का रोग', या गाण्यावर मुलींनी आक्षेपार्ह वर्तन केले.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म  'X' वर SM Faris @farismohaab नावाच्या हँडलने हा व्हिडिओ शेअर केला आहे. ४५ सेकंदाचा हा व्हिडिओ आहे. मुली व्यतिरिक्त मेट्रो कोचमध्ये इतर प्रवासी दिसत आहेत.

हा व्हिडीओ दिल्ली मेट्रोचा असल्याचा दावा ट्विटरवर केला जात आहे, मात्र 'सकाळ' या व्हायरल व्हिडिओची पुष्टी करत नाही.

Delhi Metro Viral Video
Bade Miyan Chote Miyan: ठरलं! अक्षय आणि टायगरच्या 'बडे मियाँ छोटे मियाँ' चा ट्रेलर या दिवशी होणार रिलीज

या व्हिडिओवर लोक प्रतिक्रिया देत आहेत. हे सर्व सुसंस्कृत समाजासाठी धोक्याचे आहे, असे एका नेटकऱ्याने म्हटले आहे. काही नेटकऱ्यांनी वातावरण खूप गरम असल्याचे म्हटले आहे. (Latest Marathi News)

दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन (DMRC) कडून कडक देखरेख आणि कडकपणाचे लाखो दावे करूनही, मेट्रोमध्ये अश्लीलता आणि रील मारण्याचा ट्रेंड सुरूच आहे.डीएमआरसी प्रवाशांना वेळोवेळी अशा अश्लील कृत्यांपासून दूर राहण्यासाठी विनंती करत असली तरी लोक हे मान्य करायला तयार नाहीत.

Delhi Metro Viral Video
Mahaparinirvan: गोष्ट लोकांना स्वप्न देणाऱ्या महामानवाच्या परिनिर्वाणाची; 'महापरिनिर्वाण' चित्रपट 'या' दिवशी होणार रिलीज

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com