Viral Video : मेट्रोत अवतरली भूलभुल्लैया मधील 'मंजुलिका'; पाहून प्रवाशांची पळापळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Viral Video

Viral Video : मेट्रोत अवतरली भूलभुल्लैया मधील 'मंजुलिका'; पाहून प्रवाशांची पळापळ

आपल्याकडे मेट्रोत भन्नाट प्रकार नेहमीच घडत असतात. पुणे मेट्रोमध्ये ढोल वादन, गायनाचा कार्यक्रम, लावणीचा कार्यक्रम झालेले आपल्याला पाहायला मिळाले असतील. तर अनेक नवेनवे प्रयोग मेट्रोमध्ये केले जातात. बसायला जागा मिळण्यासाठीही अनेकजण शक्कल लढवत असतात. अशाच एका मुलीचा मेट्रोतील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हेही वाचा - ..या शहरात सापडतात शेकडो रोनाल्डो आणि मेस्सी

व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा दिल्लीतील असून यावेळी एक मुलगी मंजुलिकाचे कपडे परिधान करून दिल्ली मेट्रोत चढली आणि तिने मेट्रोतील प्रवाशांना घाबरवण्यास सुरुवात केली. त्यानंतर तिचा अवतार पाहून अनेक प्रवाशांची घाबरगुंडी उडाली तर काही प्रवासी तिथून निघून गेल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होतोय. अनेकांनी हा व्हिडिओ विविध प्लॅटफॉर्मवरून शेअर केला असून त्यावर आपल्या मजेशीर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. मंजुलिका हे पात्र भूलभुल्लैया या चित्रपटातील असून विद्या बालन हिने हे पात्र केलं आहे. या पात्राचं अनेकजण अनुकरण करत असतात.

टॅग्स :delhiMetroviral video