
Govind Surya, known as the "Digital Beggar," shows QR codes on YouTube live streams, receiving thousands of micro-donations from viewers.
esakal
Summary
गोविंद सूर्या नावाचा युवक YouTube वर लाईव्ह येऊन QR कोडद्वारे ऑनलाईन भिक मागतो.
त्याचे ५ लाख सबस्क्राइबर्स, २६० मिलियनहून अधिक व्ह्यूज आणि दररोज ₹१०,००० पर्यंत कमाई होते.
आपल्या संघर्षामुळे आणि वडिलांच्या कष्टांमुळे त्याने हा अनोखा मार्ग निवडला असून लाखो लोक त्याला फॉलो करतात.
आपण रस्त्यावर, मंदिरात किंवा रेल्वे स्थानकांवर आणि अन्य सार्वजनिक ठिकाणी अनेकदा अनेक भिकारी पाहिले असतील. मुंबईतील सेलिब्रिटी भिकारी देखील चांगलाच प्रसिद्ध आहे. पण एक पठ्ठ्या चक्क ऑनलाईन भीक मागून लाखो रुपयांची कमाई करत आहे. हा भिकारी युट्यूबवर लाईव्ह येतो आणि युपीआय क्युआर कोड दाखवून भीक मागतो. या ऑनलाइन भिकाऱ्याचे नाव गोविंद सूर्या आहे. त्याच्या युट्यूब चॅनल govindsurya360 वर पाच लाखांपेक्षा जास्त सबस्क्राइबर्स आहेत.