Diljit Dosanjh Delhi Concert
esakal
Viral Video: पंजाबी गायक दिलजीत दोसांझ यांचा नुकताच दिल्लीत कॉन्सर्ट पार पडला. या कार्यक्रमाला चाहत्यांची मोठी गर्दी जमली होती. गाण्यांचा आनंद घेण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं. मात्र, या गर्दीचा फायदा एका तरुणाने चांगलाच करून घेतला. त्याने कॉन्सर्टच्या बाहेर पाण्याच्या बाटल्या विकून अवघ्या दोन तासांत हजारो रुपये कमावल्याचा दावा केला आहे. सध्या त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.