Are Your Sanitary Pads Really Clean? Viral Video
esakal
महिलांना त्यांच्या मासिक पाळीमध्ये स्वच्छतेची प्रचंड काळजी घ्यावी लागते. मासिक पाळीमध्ये स्वच्छतेकडे दुर्लक्ष केलं की, प्रचंड त्रास सहन करावा लागतो. कधी कधी त्याचं इन्फेक्शन सुद्धा होतं. त्यामुळे मासिक पाळीत महिला स्वच्छतेची भरपूर काळजी घेतात. मासिक पाळीत सुती कापडांसोबतच आता सॅनिटरी पॅड्स किंवा कपचा वापर करतात. परंतु सध्या सोशल मीडियावर सॅनिटरी पॅडचे अनेक व्हिडिओ व्हायरल होताय. त्या व्हिडिओमध्ये सॅनिटरी पॅड्स अस्वच्छ असल्याचं दिसून येतोय.