Diwali Gift Ideas Under ₹1000
esakal
Diwali Gift Ideas: दिवाळी म्हटलं की मित्र, नातेवाईक आणि ऑफिसमधील सहकाऱ्यांना भेटवस्तू देण्याची लगबग सुरू होते. दरवर्षी मिठाईचा बॉक्स किंवा ड्रायफ्रूट्स देण्यापेक्षा यंदा काहीतरी वेगळं आणि उपयोगी गिफ्ट द्यायचं असेल, तर टेक गॅजेट्स हा चांगला पर्याय ठरू शकतो. विशेष म्हणजे यासाठी हजारो रुपये खर्च करण्याचीही गरज नाही. Amazon आणि Flipkart सारख्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर १ हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत अनेक उपयोगी वस्तू मिळतात. यामध्ये ईअरबड्स, ब्लूटूथ स्पीकर, स्मार्ट बल्ब, वायरलेस माऊस अशा वस्तूंचा समावेश आहे.