Fraud: दिसतं तसं नसतं! 2 हजार देऊन भाजी खरेदी करणारा भला माणूस निघाला फेक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Viral

Fraud: दिसतं तसं नसतं! 2 हजार देऊन भाजी खरेदी करणारा भला माणूस निघाला फेक

अडाणी व्यक्तीला फसवणारे कित्येकजण आजकाल आपल्याला दिसतात. पण एखाद्या गरीब भाजीपाला विक्रेत्याला फसवून एखाद्या व्यक्तीला काय बरं मिळत असेल? अशीच एक घटना दिल्लीजवळील नोएडा येथे घडलीये. दिवाळीच्या आदल्या दिवशी एका वयस्कर भाजीविक्रेत्याला दोघेजण दोन हजाराची नोट देऊन निघून गेले. उरलेले पैसे तुम्हाला दिवाळीसाठी राहूद्या म्हणून गेले पण घडलं वेगळंच.

एखाद्याने आपल्याला जास्तीचे पैसे दिल्यावर आपण जेवढं खूश होतो तेवढंच हा वयस्कर व्यक्ती खूश झाला होता पण नंतर कळालं की त्या १२ वर्षाच्या पोराने जी दोन हजाराची नोट दिली होती ती नोट खोटी आहे. ज्यावेळी त्याला हे कळालं त्यावेळी त्याला काय वाटलं असेल? फोटोतील त्याचा चेहराच सगळं सांगून जातोय.

नोएडा वेस्ट येथील क्रिकेट स्टेडिएमच्या जवळ असलेल्या चार मुर्ती येथे हा प्रकार घडला असून प्रणव मिश्रा यांनी आपल्या ट्वीटरवर पोस्ट करून ही माहिती दिली आहे. तर या पोस्टनंतर अनेकांनी या गृहस्थाला मदत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. तर सध्या ही पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

टॅग्स :crimedelhiFraud case news