महिलेच्या तोंडातून डॉक्टरांनी बाहेर काढला 4 फुटाचा जिवंत साप; Video पाहून झोप उडेल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video Viral

महिलेच्या तोंडातून डॉक्टरांनी बाहेर काढला 4 फुटाचा जिवंत साप; Video पाहून झोप उडेल

सापाचं नाव जरी काढलं तरी सर्वांनाच भिती वाटते. तर प्रत्यक्ष साप पाहिला तर अनेकांच्या पायाखालची जमीन सरकते. पण एका महिलेच्या तोंडात साप गेला आहे हे ऐकून आपल्याला विश्वास बसणार नाही. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून सदर महिलेच्या तोंडातून तब्बल ४ फुटाचा जिवंत साप डॉक्टरांनी बाहेर काढला आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा fascinating Footage या ट्वीटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तर या व्हिडिओमध्ये एका महिलेच्या तोंडातून चार फुटाचा साप डॉक्टरांनी बाहेर काढल्याचं दिसत आहे. तर बाहेर आल्यावर सापाची वळवळ आपल्याला दिसत असल्यामुळे हा साप जिवंत असल्याचं बोललं जातंय. तर हा थरारक व्हिडिओ अनेकांनी शेअर केला आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून पसंती मिळत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून लाईक केलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जात असतात.

सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये विनोदी व्हिडिओ, डान्स व्हिडिओ, लग्नातील व्हिडिओ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओचा सामावेश असतो. सध्या सोशल मीडिया हे तरूणांच्या मनोरंजनाचे साधन बनले आहे.

टॅग्स :CobraVideosnakeviral post