Viral Video: 'आमच्या इथे कुत्र्याकडून मका काढून मिळेल'; स्पीड पाहून चकित व्हाल

Dog Viral Video
Dog Viral VideoSakal

दाताने मका कापणाऱ्या एका कुत्र्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओतील त्याची स्पीड पाहून तुम्हीही चकित झाल्याशिवाय राहणार नाहीत. तर हा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत असून अनेक लोकांकडून हा व्हिडिओ शेअर केला जात आहे.

(Dog Maize Cutting Viral Video)

शेती क्षेत्रातील नवं संशोधन आणि प्रेरणादायी कुत्रा असा टॅग देऊन हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. चेतन बढे यांनी आपल्या ट्वीटरवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत दोन कुत्रे मका तोडत आहेत. तर मकाचे बुडखेसुद्धा उपटून काढत आहे. तर आमच्या इथे कुत्र्यांकडून मका काढून मिळेल अशा कमेंट या व्हिडिओखाली आल्या आहेत.

दरम्यान, या व्हिडिओतील उपद्रवी कुत्रे शेतकऱ्याच्या मका पिकाचे नुकसान करत असून उपद्रवी कुत्र्याला कंटाळून सदर शेतकऱ्याने हा व्हिडिओ शूट केला अशल्याची माहिती आहे. पण या कुत्र्याची स्टाईल आणि स्पीड पाहून धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. या व्हिडिओवर गंंमतीशीर कमेंट येत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com