Viral Video
Viral VideoSakal

Viral Video : "अपने गल्ली में कुत्ते भी शेर बन जाते है"; गल्लीतील सिंहाला कुत्र्यांनी खरोखर पळवलं

रात्रीच्या वेळी हा सिंह गावात घुसला आहे.

अपने गल्ली में कुत्ते भी शेर हो जाते हैं... हा डायलॉग आपण अनेकदा ऐकला असेल. आपल्यापेक्षा वरचढ व्यक्ती भांडायला आला की, अनेकजण आपला सुरक्षित भाग शोधत असतो. आपल्यासोबतही असे प्रकार घडले असतील पण एका गल्लीत आलेल्या सिंहाला चक्क कुत्र्याने पळवून लावलं आहे.

Viral Video
एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अनेकांनी या व्हिडिओला पसंती दिली आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक सिंह रात्रीच्या वेळी एका गल्लीतून फिरताना दिसत आहे. तर त्याच्यापाठीमागे गल्लीतील काही कुत्रे लागले आहेत. कुत्रे पाठीमागे पळाल्यानंतर हा सिंह पुढे पळताना आपल्याला दिसत आहे. सध्या हा व्हिडिओ चांगलाच शेअर केला जात आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून पसंती मिळत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून लाईक केलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जात असतात.

सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये विनोदी व्हिडिओ, डान्स व्हिडिओ, लग्नातील व्हिडिओ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओचा सामावेश असतो. सध्या सोशल मीडिया हे तरूणांच्या मनोरंजनाचे साधन बनले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com