
Ganpati Visarjan Viral Video
ESakal
गणेश चतुर्थीचा उत्सव भगवान गणेशाच्या प्रतिष्ठापने सुरू होतो. त्यांच्या मूर्तीच्या विधीवत विसर्जनाने संपतो. परंपरेनुसार, भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला प्रत्येक घरात गणपतीचे स्वागत केले जाते आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी त्यांना भावनिक निरोप दिला जातो. विसर्जनाची परंपरा हे दर्शवते की भक्तांनी गणपती बाप्पांना आदराने निरोप दिला आणि पुढच्या वर्षी पुन्हा येण्यासाठी त्यांना आमंत्रित केले.