

Dumper truck seen dumping construction stones on Expressway
Viral Video Shows Dangerous Driving Incident : उत्तरप्रदेशातील नोएडामध्ये आरटीओची तपासणी टाळण्यासाठी, एका डंपर ट्रकने 'ईस्टर्न पेरिफेरल एक्सप्रेसवे' वर वेगाने प्रवास करताना रस्ते बांधकामासाठी वापरले जाणारे खडे रस्त्यावरच खाली टाकले. गुरुवारी सकाळी चक्रसैनपूर गावाजवळ, चुकीच्या दिशेने चालणाऱ्या या डंपरने आपली हायड्रोलिक ट्रॉली वर उचलली आणि त्यातील खडे खाली टाकले. यामुळे एक्सप्रेसवेचा सुमारे १०० मीटरचा भाग खड्यांनी व्यापला गेला, ज्यामुळे वाहतूक दोन तास विस्कळीत झाली आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.