Elon Musk's Grok AI Abuses X User in Hindi : एलॉन मस्क यांच्या कंपनीने विकसित केलेल्या ग्रोक या एआय चॅटबॉटची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. अनेक युजर्स सोशल मीडियावर ग्रोकला प्रश्न विचारत आहेत. विशेष म्हणजे ग्रोक देखील त्यांना उत्तर देतो आहे. मात्र, एका युजरला ग्रोकनं चक्क शिव्या दिला आहेत. इतक नाही, तर त्यानंतर मी मस्करी करत होतो, असंही या चॅटबॉटने म्हटलं आहे. त्यामुळे एआयच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.