
भारतीय कंपनीत एचआरचं काम करणाऱ्या एका व्यक्तीची पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये दावा केलाय की, एका कर्मचाऱ्यानं पहिलं वेतन मिळाल्यानंतर पुढच्या पाचच मिनिटात राजीनामा दिला. सकाळी दहा वाजता वेतन बँक खात्यात जमा झालं, १०.०५ मिनिटांनी राजीनाम्याचा मेल आला. एचआरने म्हटलं की, कंपनीच्या या कर्मचाऱ्याला ऑनबोर्डिंग करण्यासाठी अनेक तास लागले. टीमने त्याला प्रशिक्षण द्यायला अनेक आठवडे घालवले पण पगार मिळताच त्यानं पाच मिनिटात नोकरी सोडली.