
लंडन : आजवर तुम्ही तरुणांनी केलेल्या अनेक एक्सायटिंग आणि थरारक गोष्टी पाहिल्या असतील. पण मेट्रोच्या वेगापेक्षाही अधिक वेगानं पळण्याचा विक्रम एका तरुणानं केला आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियामध्ये चांगलाच व्हायरल झाला आहे. त्याच्या या कृतीचं नेटकऱ्यांकडून खूपच कौतुक होतंय. (Faster than metro Watch the amazing Viral Video of the young man)
आजतकचे एमडी मिलिंद खांडेकर यांनी हा व्हिडिओ ट्विट केला असून तो लंडनधला असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं की, "बंदा मेट्रो से जीत गया. अगले स्टेशन तक दौड़कर ट्रेन फिर पकड़ ली. ये वीडियो लंदन का है" पाहुयात या तरुणाचा भन्नाट व्हिडिओ.
या व्हिडिओमध्ये एक तरुण लंडनमधील मेट्रोतून प्रवास करत असताना एका स्टेशनवर उतरतो. उतरल्या उतरल्या तो धावतच सुटतो, स्टेशनमधून बाहेर पडत तो पुढच्या स्टेशनच्या दिशेनं धाव घेतो. त्यानंतर काही मिनिटं धावल्यानंतर तो पुढच्या स्टेशनवर पोहोचतो आणि पुन्हा मागून येणाऱ्या त्याच मेट्रोत चढतो. यावरुन तो मेट्रोपेक्षाही वेगानं धावत असल्याचं दिसून आलं. त्यामुळं त्याच्या या शरारक कृतीचं नेटकऱ्यांकडून कौतुकही होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.