Father Daughter Emotional Video Goes Viral
esakal
Trending News
Viral Video : ''मॅडम माझ्या मुलीला मारू नका, तिला आई नाहीये'', भर वर्गात वडीलांना अश्रू अनावर; बाप-लेकीचा भावूक करणारा व्हिडीओ
Father Daughter Emotional Video Goes Viral : व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत एक व्यक्ती आपल्या लहान मुलीसोबत शाळेतील बाकावर बसलेली दिसते. या व्हिडीओमध्ये एका असहाय वडिलांची आपल्या लेकीसाठी असलेली माया बघून अनेक जण भावूक झाले आहेत.
Emotional Indian Viral Video : सोशल मीडियावर दररोज वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होतात. यापैकी काही धक्कादायक असतात, काही हसवणारे, तर काही व्हिडीओ थेट काळजावा भिडणारे असतात. असाच एक काळजाला भिडणारा बाप लेकीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या व्हिडीओमध्ये एका असहाय वडिलांची आपल्या लेकीसाठी असलेली माया बघून अनेक जण भावूक झाले आहेत.
