Daughter’s First Period Celebrated with Love video viral
esakal
सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ हसवणारे असतात आणि काही व्हिडिओ भावनिक जोड देणारे असतात. दररोज सोशल मीडियावर बऱ्याच गोष्टी व्हायरल होत असते. अनेक कुटुंबात मुलीला देवीचं रुप मानलं जातं. मुलीला मुलाप्रमाणे वागणूक दिली जाते. अशातच आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये मुलीला पहिल्यांदा मासिक पाळी आली म्हणून घरच्यांनी अनोख्या पद्धतीने आनंद व्यक्त केलाय.