Helicopter Crash : रेस्क्यूसाठी गेलेल्या हेलिकॉप्टरला हवेत लागली आग! दुर्घटनेत 2 ठार; थरकाप उडवणारा Video

हा थरकाप उडवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Helicopter Crash
Helicopter Crash Sakal

फ्लोरिडा : फायर रेस्क्यू हेलिकॉप्टरला हवेतच आग लागून मोठी दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेमध्ये दोन जण ठार झाले असून फ्लोरिडा येथील पोम्पानो बीच येथे ही घटना घडली. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्डाच्या म्हणण्यानुसार, हेलिकॉप्टरमध्ये तीन जण होते, त्यापैकी एकाचा मृत्यू झाला असून एका महिला नागरिकाचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. 19 वर्षांचा अनुभव असलेले ब्रॉवर्ड शेरीफच्या ऑफिसचे कॅप्टन टेरीसन जॅक्सन (वय - 50) यांचा मृत्यू झाला. त्याचबरोबर हेलिकॉप्टर अंगावर कोसळून एका महिलेचाही मृत्यू झाल्याची माहिती ब्रॉवर्ड शेरीफ कार्यालयाने दिली.

Helicopter Crash
MP Pritam Munde Video : कार्यक्रमात बोलताना प्रितम मुंडेंच्या डोळ्यात पाणी! गावकऱ्यांचीही मागितली माफी

दरम्यान, हेलिकॉप्टरमध्ये असलेल्या दोघांचा जीव वाचला असून त्यांना गंभीर दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे. एक पायलट आणि एक पॅरामेडिक या दुर्घटनेतून वाचले आहेत. त्याचबरोबर दोन नागरिकही जखमी झाले असून त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती अधिकारी ग्रेगरी टोनी यांनी दिली.

या घटनेचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये हेलिकॉप्टर हवेत असताना त्याला आग लावली आणि त्याच्यावरील नियंत्रण सुटल्यावर ते गोलगोल फिरून खाली पडल्याचं दिसत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com