

ग्रामीण संस्कृती, डॉल्बीचा धडाका आणि भारतीय गाण्यांची जादू यांचा अनोखा मिलाफ पाहून नेटकरीही खुश झाल्याचे दिसत आहे.
esakal
Viral Video Foreigner Dances : सध्या उसाचा सिझन सुरू असल्याने ग्रामीण भागात उसाने भरलेल्या ट्रॅक्टरची वाहतूक दिवसरात्र सुरू आहे. शेतकरी रान रिकामे होताच लगेच नांगरट करणे, उसाच्या ट्रॉली भरून उसाची साखर कारखान्याकडे ने-आण सुरू असते. अशाच एका ठिकाणी इंधन भरण्यासाठी ट्रॅक्टर चालक पंपावर आला होता. त्यावेळी त्याच्या ट्रॅक्टरमध्ये मोठ्या आवाजात हिंदी गाणी लावण्यात आली होती.