"चौथा लाडू मिळाला नाही कारण त्याचा मृत्यू..."; रूग्णाच्या पत्नीने दिलेल्या लाडूवर डॉक्टरची भावनिक Post Viral

आपल्या रूग्णाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या पत्नीने डॉक्टरला लाडू दिले होते पण पत्नीने तीनच लाडू दिले.
Viral Post
Viral PostSakal

एका डॉक्टरची भावनिक पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. आपल्या रूग्णाचा मद्यपानामुळे मृत्यू झाल्यानंतर त्याच्या पत्नीने डॉक्टरला लाडू दिले होते पण पत्नीने तीनच लाडू दिले. त्यानंतर डॉक्टरला चौथ्या लाडूचा विचार मनाला टोचून गेला आणि त्याने ही भावनिक पोस्ट शेअर केली. त्याने आपल्या ट्वीटर पोस्टमध्ये लिहिलं आहे की....

"हे 3 लाडू माझ्या रुग्णाच्या पत्नीने काही आठवड्यांपूर्वी त्याच्या वाढदिवशी मला दिले होते. ते कुटुंब सध्या आनंदी आहे."

माझा रूग्ण पॉल हा मागच्या पंधरा वर्षाहून अधिक काळापासून मद्यपान करत होता. त्यानंतर त्याला आजार जडला आणि तो उपचारासाठी माझ्याकडे आला. तीन महिन्यांपूर्वी, त्याला अल्कोहोल-संबंधित गंभीर असलेला हिपॅटायटीस आजार झाला होता. त्यानंतर त्याला लिव्हर ट्रान्सप्लँटसाठी आमच्या युनिटमध्ये स्थानांतरित करण्यात आले.

Viral Post
Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

लिव्हर ट्रान्सप्लँट हा त्याच्यासाठी सुरूवातीचा पर्याय नव्हता. त्याचे छोटे प्रोव्हजन आणि बेकरीचे दुकान आहे. त्याला एक पाच वर्षाची आणि एक नऊ वर्षाची अशा दोन मुली आहेत. त्याची बायको पार्ट टाईम जॉब करत होती पण तिने मुली झाल्यानंतर हा जॉब सोडून दिला. त्यामुळे लिव्हर ट्रान्सप्लँटसाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते.

म्हणून आम्ही त्याला अँटिबायोटिक्स लावले आणि त्याचे आयुष्य वाढवण्यासाठी त्याला सॅल्व्हेज स्टूल ट्रान्सप्लांटवर ठेवले. त्याने त्याला प्रतिसाद दिला. यावेळी अल्कोहोल-संबंधित हिपॅटायटीसचे निराकरण झाले पण त्याला पुन्हा सिरोसिस नावाचा आजार झाला. त्यानंतर आम्ही त्याच्यावर मानसोपचार ट्रीटमेंट केली. त्याने त्याला चांगला प्रतिसाद दिला. पण त्यानंतर त्याने पुन्हा मद्यपान करण्यास सुरूवात केली.

एके दिवशी पॉलचा चुलतभावाने मला ही गोष्ट सांगितली, त्यावेळी मी त्याला समजून सांगितले. तुला दोन मुली आहेत, त्यांना तुझी गरज आहे असं मी त्याला सांगितलं तेव्हा तो माझ्याजवळ येऊन रडला आणि म्हणाला हे सर्वांत आकर्षित करणारे साधन आहे. काही दिवसानंतर त्याची पत्नी माझ्याकडे आली आणि म्हणाली, त्याला आता नीट करू नका.

कारण, तो आजारपणातून बाहेर आला की परत दारू प्यायला लागेल आणि परत आजारी पडेल. यामुळे आमचे बरेच पैसे वाया जातात. त्याला थोडं आजारी राहू द्या, जेणेकरून मी दुकानात काम करू शकेन आणि सर्वांना पैसे पुरवू शकेन.

Viral Post
सिंहाच्या पिंजऱ्यात जाणं बेतलं जीवावर; मान पकडून ओढत नेलं | थरारक Viral Video

काही महिन्यांनंतर, त्याला पुन्हा हेपेटायटीस आजार झाला आणि त्याच्या किडनीला दुखापत झाली. पण कुटुंबियांनी त्याच्यावर उपचार करण्यासाठी नकार दिला. ते रहायला माझ्यापासून ४०० किमी अंतरावर होते. त्याच्याकडे त्याला हॉस्पिटलमध्ये सोडायला सुद्धा पैसे नव्हते.

मी पुढचे दोन आठवडे त्यांना फोनवर कोणते औषधे घ्यायचे ते सांगत होतो. त्यामुळे तो घरीच उपचार घेत होता. पण पॉलला वारंवार अल्कोहोल-संबंधित हिपॅटायटीस असल्याचे निदान झाल्यानंतर 18 व्या दिवशी घरीच त्याचा मृत्यू झाला.

पॉलच्या मृत्यूनंतर त्याची पत्नी मला भेटायला आली. तिने येताना तीन लाडू माझ्यासाठी आणले. एक तिच्याकडून आणि दोन तिच्या दोन मुलींकडून. कारण मी उपचारादरम्यान तिला किंवा पॉलला कधीच वाईट वागणूक दिली नाही किंवा आजाराबद्दल दोष दिला नाही. मी पॉलच्या वागण्याबद्दलही त्याला कधीच बोललो नाही. ती आणि तिच्या मुली आता मोकळ्या झाल्या आहेत. त्या शाळेतही जात आहेत आणि दुकानही व्यवस्थित चालू आहे.

Viral Post
पहाटेचा शपथविधीनंतरही पवारांनी अजित पवारांना माफ कसं केलं? आत्मचरित्रात मोठा खुलासा

पण मी चौथ्या लाडूचा विचार करू शकतो, जो मला पॉलकडून मिळायला हवा होता पण त्याच्या मृत्यूमुळे मला तो मिळाला नाही. एका महिलेचा पती गेला, दोन चिमुकल्या मुलींचे वडील गेले, ही त्यांच्या आयुष्यातील सर्वांत मोठी पोकळी आहे. जी रूखरूख मला आजही आहे.

मी कधीच कुणालाही दारू पिण्याचा सल्ला देत नाही, जरी त्यांची तब्येत व्यवस्थित असली तरीही. कारण यामुळे अनेक सुखी कुटुंबाचे तुकडे झाल्याचं मी पाहिलं आहे."

अशी भावनिक पोस्ट डॉक्टरने लिहिली असून लोकांना दारू न पिण्याचा सल्ला दिला आहे. या पोस्टवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com