
Maha kumbh 2025: प्रयागराज इथं गेल्या दीड महिन्यापासून सुरु असलेल्या महाकुंभमेळ्याची महाशिवरात्रीच्या दिवशी सांगता झाली. या दीड महिन्यात तब्बल ६५ कोटींहून अधिक भाविकांनी इथल्या त्रिवेणी संगमावर पवित्र स्नानाचा लाभ घेतला. शेवटच्या दिवशी ३ लाख भविकांनी इथं पवित्र स्नान केलं. पण यानंतर दुसऱ्या दिवशीची या संगमावरील दृश्ये आता समोर आली आहेत. हा संपूर्ण परिसर निर्मुष्य दिसतो आहे. त्यामुळं ड्रोनमधून घेतलली ही दृश्ये अक्षरशः अंगावर येत आहेत.